फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी ) :-
डोर्लेवाडी येथील सहेली फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व महिलांसाठी कबड्डी ,सॅकरेस,लगोर चे सामने व शिवकालीन लाटी-काटी ,ढाल पट्टा, तलवार चालवणे व कराटे चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या वेळी विजेत्या महिलांचा सन्मान सिने अभिनेत्री सोनल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सहेली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ रोहिणी आटोळे-खरसे यांनी केले होते.
कराटे क्षेत्र सौ पुनम नाळे, आर्या बोडरे ,सैनिक पत्नी पुजा काळकुटे,
वैदकीय क्षेत्र डॉ संपदा हिंदोळे, डॉ केतकी नाळे,आदर्श माता नंदा भोपळे, स्केटिंग क्षेत्र, एकता शहा,पोलीस क्षेत्र राणी नाळे या महिलांचा सन्मान करण्यात आला .
या प्रसंगी डोर्लेवाडी ग्रामपच्यात च्या सरपंच सुप्रिया नाळे , सदस्या सुमित्रा वामन व सहेली फौंडेशन च्या सदस्या
तब्बसुम शेख, उषा निलाखे, रुपाली काळेबेरे, सोनाली जाधव ,माया घनवट आदी उपस्तीत होत्या.
महिलांच्या कलागुणांना वाव भेटावा व त्यांना हक्काचे मैदान व व्यासपीठ निर्माण व्हावे त्याच्या कार्याचा गौरव व्याहवा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सहेली फौंडेशन च्या अध्यक्षा सौ रोहिणी आटोळे खरसे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिला व मुलींमध्ये सुद्धा गुणवत्ता असते चूल व मूल विचारांच्या पलीकडे जाऊन महिला भाग घेतात याचे समाधान वाटत असल्याचे अभिनेत्री सोनल नाईक यांनी सांगितले.
अभिनेत्री सोनल नाईक बरोबर महिलांनी नृत्याचा ठेका धरला. सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार तबसुम शेख यांनी मानले