सूर्य नगरी मधील
“फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल कनेक्ट पोदार जम्बो किड्स” या शाळेत जागतिक महिला दिन निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणे महिलांचा सन्मान करून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला
या प्रसंगी
पुणे जिल्हा परिषद मा. अध्यक्षा सौ.योगिता कोकरे व डॉ. कोयल जळक , डॉ. नेत्रा सिकची, सौ. राजलक्ष्मी मोरे, सौ. विजया काळे, डॉ. स्मीता बोके, सौ.मनिषा रासकर,सौ. सोनल बनकर , सौ.जयश्री लोणकर ,सौ. अपर्णा मोकाशी, डॉ.अर्चना सोनवणे, सौ.वैशाली तावरे ,सौ.अंजली माने व सौ.रुपाली सचिन शिंदे आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.
“जुन्या काळातील महिला आणि आताची महिला यांची सांगड” त्यामुळे ड्रेस कोड होता काष्टा साडी!… हा सोहळा करण्याचा मुख्य उद्देश हाच होता की, काही जुन्या गोष्टी आणि काही नवीन गोष्टी आत्मसात करत सशक्त आणि सुदृढ महिला घडायला हव्यात व नवीन पिढीला मागदर्शन व संस्कारित व्याहवी या साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापिका सुचित्रा बाकरे सांगितले.
डॉ नेत्रा सिकची यांनी डोळ्यांचे आजार व घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले.
शाळेतील कर्तुत्ववान शिक्षिका मोनिका झगडे, सारिका उगले, वंदना देवकाते, साधना बोराटे, अश्विनी शिंदे, योगिता भोसले, सायली जाधव, वासंती मावशी आणि स्वाती दीदी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.