फलटण टुडे (बारामती ): –
बारामती नगरपरिषद, बारामती आणि महिला व बालकल्याण विभाग, बारामती तसेच एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया,बारामती आणि भगिनी मंडळ, आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली.
रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी श्री. महेश रोकडे मुख्याधिकारी, बा. न. प., आणि शुभांगी लोणकर ( रिजनल फ़ॉरेस्ट ऑफिसर , बारामती) विभाग )तसेच श्री. हनुमंत पाटील ( अँडिशनल क्लेकटर ) आणि सौ सुप्रिया बांदल यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. महिलांचा सहभाग लक्षणीय होती. सोबत पुरुष आणि मुलांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला
या कार्यक्रमात मान्यवरांनी सदर रॅली पूर्ण करणाऱ्या सभासदांना एक बारामती नगर परिषद यांचे स्वछतादूत / स्वछतामित्र सर्टिफिकेट आणि नाश्ता दिला तसेच एक छोटेखानी कार्यक्रम झाला, ज्यामध्ये काही महिलांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला.
1) डॉ. अंजली शेटे (व्हाइस डीन, मेडिकल कॉलेज)*
2) सौ. सोनाली क्षीरसागर (मुख्याध्यापक MES इंग्लिश मिडीयम स्कुल)*
3)सौ.मंगला बोरावके ( कवियत्री, साहित्य लिखाण)*
4)कु. कोमल दळवी ( कमांडो ट्रेनर, BSF)*
5) सौ सपना ननवरे (आदर्श गृहिणी)*
या सर्वाना एक सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सन्मानित केले
सदर सायकल रॅली बारामती नगर परिषद बारामती, महिला बालकल्याण विभाग, आणि माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत, आणि सर्वांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.. उपस्थिततांमध्ये टेरेस गार्डन करु इच्छिणाऱ्या महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात मोठी कुंडी, भाजीपाला रोपे नगरपालिका यांच्यामार्फत वाटण्यात आली आणि येथून पुढे बारामती शहरास सायकलींचे शहर ओळख निर्माण करावी , असा संकल्प तमाम सायकलिस्टच्या वतीने जाहीर करण्यात आला