मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ६ ) :-  
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारा ( DIET) व पंचायत समिती फलटण ( BRC) यांच्या संयुक्त विद्यमाने मालोजीराजे शेती विद्यालय , फलटण येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम पर क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ ते ६ मार्च २०२४ पर्यत हे प्रशिक्षण ९ वी ते १२ वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणार असून आज मा. प्राचार्य( DIET) साताराचे डाॅ.कोरडे साहेब यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देली. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साली लागू झाले असून भारताच्या शैक्षणिक धोरणामध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. यामध्ये शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, भाषा, तंत्रज्ञान, अर्थविषयक बाबी आणि अंमलबजावणी यामध्ये मूलभूत बदल झाले असून शिक्षणाच्या आकृतीबंधा मध्ये झालेला बदलांची माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी , उद्दिष्टांची माहिती शिक्षकांना याची माहिती मिळावी या हेतूने सदर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे.

यावेळी डायटचे प्राचार्य मा. श्री डॉ. रामचंद्र कोरडे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले व त्यांनी सांगितले की शिक्षक हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक असुन तो विद्यार्थ्यांना आकार देऊन त्यांचा सर्वांगिण विकास करत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांची क्षमता कशी विकसित करता येईल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले . 

तसेच या तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रामध्ये (DIET ) चे अधिव्याख्याता मा.डाॅ.श्री सतिश फरांदे यांनी शिक्षकांमध्ये असलेल्या क्षमता ओळखुन स्वत:चा विकास करून पर्यायाने विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा विकास करावा असे मार्गदर्शन केले .यावेळी पंचायत समितीच्या (BRC) फलटणच्या प्रमुख मा. सौ. दमयंती कुंभार व मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.कोळेकर , उपस्थि होते .

यावेळी फलटण ऐज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालयाने गेली अडीच महिने विविध प्रशिक्षणासाठी आपल्या प्रशालेतील हॉल उपलब्ध करून देऊन वेळोवेळी सहकार्य केले याबद्दल मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. ज्ञानदेव कोळेकर यांचा तर गेली अडीच महिने कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन करून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल श्री मनोज कदम व श्री उत्तम घोरपडे यांचा सत्कार (DIET ) चे अधिव्याख्याता मा. डाॅ. श्री सतिश फरांदे यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला .
यावेळी उपस्थित जिल्हा प्रशिक्षण संस्था फलटणचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ, सतीश फरांदे व त्यांच्या सहकार्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खे असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक (सुलभक) म्हणून प्रा. मिलिंद शिंदे, श्री प्रा. सतिश जंगम, प्रा. विकास तरटे ,श्री चंदन कर्वे, सौ सीमा मुळीक, सौ वैशाली कांबळे, सौ शुभांगी पुरी, यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रांचा लाभ घेतला त्याबद्दल त्यांनां प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयभवानी हायस्कूल तिरकवाडीच्या सौ सिमा मुळीक यांनी केले. तर आभार मा. मालोजीराजे शेती विद्यालयाचे श्री उत्तम घोरपडे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!