फलटणकर वृत्तसेवा (बारामती ) : –
जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धा व पु. ल. देशपांडे करंडक 2024 पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य पारितोषिक वितरण समारंभात ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल सावळ,बारामतीची ” हिरकणी या मराठी ऐतिहासिक एकांकिका खाजगी प्राथमिक विभाग यातुन उत्तेजनात क्रमांक मिळवत यशस्वी झाली.
मा. प्रतिमा जोशी (प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शक), मा. रमेश चव्हाण(जि.प. परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. नेहा बेलसरे,मा. प्रकाश खोत यांच्या शुभहस्ते सांघिक पारितोषिक,उत्कृष्ट अभिनयाचे कु. दूर्वा बनसोडे,उत्कृष्ट दिग्दर्शन कलाशिक्षक श्रीराम सावंत यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या नाट्य स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून 400 संघांनी सहभाग नोंदवला होता.
या एकांकिकेतील दूर्वा बनसोडे, श्रीतेज सोलनकर,अनुष्का डोईफोडे, श्रेयश जाधव,आराध्या काळे,जान्हवी गवसणे,दुर्वा वणवे,राजनंदनी रणदिवे, अन्वी सातकर,स्वरा कांबळे, प्रणव पवार, श्रेयश मुंडे,हर्ष दळवी, श्रेयश चव्हाण, मयुर सोरटे,स्वरा टकले सर्व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे यांनी केले.यावेळीे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक सांगळे, दीपक बिबे ,सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक सोमनाथ आवताडे,दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे,निलीमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप,रिनाज शेख सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.