चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीबद्दल अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( सोमनथळी दि २९ ) :-
फलटण तालुक्यातील सोमनथळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईसचेअरमन निवडीमध्ये चेअरमनपदी श्री विजय तात्याबा गोफणे व व्हाईस चेअरमनपदी श्री रोहन शिवाजी अहिवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
याप्रसंगी गावातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती फलटण पंचायत समिती फलटणचे माजी सभापती मा . श्री दत्तात्रेय गुंजवटे , श्रीराम कारखाना फलटणचे माजी संचालक श्री भिवासो पोकळे , श्रीराम कारखाना फलटणचे माजी संचालक ,श्री हनुमंत दादाराम सोडमिसे ,सोमंथळी सहकारी सोसायटी चे चेअरमन श्री अशोक भापकर , सरपंच किरण सोडमिसे ,उपसरपंच लखन यादव ,पोपटराव गोफणे चेअरमन श्री सुभाष बोडरे , श्री संभाजी गोफणे, श्री शंकर नाना शिपकुले, श्री मुकुटराव शिपकुले ,श्री हिराचंद यादव ,श्री आबाजी शिपकुले ,दत्तात्रेय गोफणे , श्री सचिन भापकर , श्री संजय गोफणे ,श्री अभिजीत गोफणे , श्री कृष्णा पोकळे, सोसायटीचे सर्व सन्माननीय सभासद सर्व संचालक मंडळ तसेच सचिव श्री अण्णासो सोडमीसे, सचिन बोडरे, गणेश करचे उपस्थित होते .
या निवडी बद्दल विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या निवडी प्रसंगी मान्यवरांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .