फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि. 29) :–
२८ फेब्रुवारी रोजी अनंतराव पवार इंग्लिश मेडीयम स्कुल च्या मुलांच्या वार्षिक बेल्ट परीक्षा संम्पन्न झाल्या, या परीक्षेत स्कुलच्या एकूण ३०२ मुलांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदवीला, या स्कुल मध्ये गेली २ वर्ष मास्टर साहेबराव ओहोळ स्कुल च्या प्रिन्सिपल श्रीमती सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेंच्याक सिलाट या खेळाचे प्रशिक्षण देत आहेत, यामध्ये मुलांचे शारीरिक, मानसिक व बैधिक विकास करणे, तसेच मुलांना राष्ट्रीय अंतराराष्ट्रीय स्पर्धेत खेळविणे व खेलो इंडिया पिंच्याक सिलाट उमन्स लीग खेळविणे इत्यादी उद्धेशने अनंतराव पवार इंग्लिश स्कुल मध्ये कराटे चे प्रशिक्षण सुरु केले आहे. मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२३ रोजी या सर्व मुलांची बेल्ट ग्रेडिशन पार पढले होते. आणि या वर्षी सर्व मुलांनी प्रॅक्टिस करून बेल्ट ग्रेडिशन परीक्षेत सहभाग नोंदविला व येलो आणि ऑरेंज बेल्ट परीक्षा पास झाले.
पास झालेल्या मुलाची परीक्षा ग्रँडमास्तर आनंदकर भय्या जयश अनिल दुबळे यांनी ही परीक्षा यशस्वी घेतली, या सर्व मुलांना स्कुल च्या प्रिन्सिपल श्रीमती सरिता शिंदे यांनी मुलींना कराटेचे ट्रेनिंग जीवनात खूप महत्वाचे आहे. असे सांगितले