विकास कामे व सामाजिक बांधिलकी महत्वाची : सुनेत्रा पवार

बिरजू मांढरे यांच्या वतीने ‘नारी शक्तीचा सन्मान’                                  सोहळा संपन्न 

सुनेत्रा पवार यांचा सन्मान करताना बिरजू मांढरे, प्रियांका मांढरे व इतर पदाधिकारी(छायाचित्र: कुचेकर) 

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती ) :-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे होत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत चे रूप बदलले आहे व राज्यात आदर्श अशी सार्वजनिक सदनिका उभी राहिली आहे विकास कामे करत असताना बिरजू मांढरे व सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली व नागरिकांचे हित पाहिले हे कौतुकास्पद व महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
मा. उपनगराध्यक्ष व नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने ‘नारी शक्तीचा सन्मान ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सुनेत्रा पवार उपस्तीत महिलांना मार्गदर्शन करत होत्या.
या प्रसंगी मा. नगरसेवक किरण गुजर मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, अभिजीत जाधव मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा अनिता गायकवाड,
सपकळवाडी चे सरपंच तानाजी सोनवणे व अजित सोनवणे,सागर भिसे,पप्पू खरात,केदार पाटोळे,
विजय तेलंगे,किरण बोराडे,तुषार शिंदे
अंकुश मांढरे,निलेश जाधव,सुनील शिंदे,शिर्डी चे पै.मदन मोका, जालिंदर सोनवणे व आदी मान्यवर उपस्तीत होते.
या प्रसंगी पोलीस क्षेत्रात, स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व ‘होम मिनिस्टर ‘ कार्यक्रम मधील विजेत्या महिलांचा सन्मान सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत पूर्ण होणे हे स्वप्न अजित दादांनी पूर्ण केले व या प्रभागातील सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला नाही त्यामुळे अजित दादांच्या विचारांचा खासदार विजयी करणार असल्याची ग्वाही दिली व महिलांच्या उत्कृष्ट कार्यास शाबासकी मिळावी म्हणून सदर कार्यक्रम चे आयोजन केल्याचे नगरसेवक बिरजू मांढरे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
या प्रसंगी किरण गुजर यांनी मनोगत मध्ये बिरजू मांढरे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
 होम मिनिस्टर विजेत्या महिलांना पैठणी, फ्रीज, मिक्सर, कुकर आदी गृहउपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर विविध गीते गरुडा यांनी गायली.महिलांनी राजकीय उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!