**-
फलटण टुड (बारामती ): –
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मराठी शाळेतील शिक्षक व लेखक लक्ष्मण जगताप लिखित लेट्स अचिव्ह या पुस्तकाचे प्रकाशन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रावहिनी पवार ,संस्थेच्या सचिव ॲड.निलिमाताई गुजर,विश्वस्त डॉ .राजीव शहा तसेच संस्थेचे रजिस्ट्रार श्रीष कम्बोज सर या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते
गदिमा सभागृहात आयोजित विद्या प्रतिष्ठान स्नेहमेळाव्यात झाले.
जगताप यांचे लेट्स अचिव्ह हे पुस्तक साध्या सोप्या व प्रसन्न भाषेत असून बालकांची जडणघडण व व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त असल्याने निश्चितच वाचकवर्ग या पुस्तकाचे स्वागत करेल.
जगताप यांचे शैक्षणिक व सामाजिक विषयावरील लिखाण अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहे. जगताप हे मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचन प्रेरणा अभियान राबवितात. लेट्स अचिव्ह हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. यापूर्वीच्या आत्मप्रेरणा पुस्तकास वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.