फलटण टुडे वृत्तसेवा दि 29 :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागा तर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च 2024 ची मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि.कॉलेज फलटण केंद्र क्र. १००३ येथे दि.1/ 3/2028 ते २६/०३/२०२४ या कालावधी परीक्षा होणार असुन परीक्षा क्रमांक F025105 ते F025503 या क्रमांकांची बैठक व्यवस्था केली आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकानी याची नोंद घ्यावी विद्यार्थ्याने वरील केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रका प्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळख पत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळे पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल आणू नये विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपी मुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पारपाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केंद्रप्रमुख श्री. विकास व. काकडे ( उपमुख्याध्यापक ), व श्री. कोळेकर डी.एन. (प्राचार्य) मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि.कॉलेज, फलटण तसेच श्री.काळे बी.डी. (उपप्राचार्य) व सौ.कांबळे एस.डी. (पर्यवेक्षिका) तसेच श्री मनोज कदम, श्री राकेश नलावडे. यांनी केलेले आहे.