*फलटण क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न*

 

फलटण क्रॉसकंट्री स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून सुखात करताना राजगुरु कोथळे, श्रीमंत संजीवराजे,श्रीमंत अनिकेतराजे, शिवाजीराव घोरपडे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि 28 ) :-
फलटण एज्युकेशन सोसायटी , क्रीडा समिती फलटण व फलटण जिमखाना फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फलटण क्रॉसकंट्री स्पर्धा ह्या महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या.
 श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल , जाधववाडी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय अँथलेटिक्स कोच मा.श्री राजगुरू कोथळे तसेच महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व युवा नेते युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 
या स्पर्धेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला .या स्पर्धेमध्ये 1700 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सातारा, सांगली ,कोल्हापूर , वाई, बारामती , गडहिंग्लज,बेळगाव अहमदनगर , श्रीगोंदा अशा विविध ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण फलटण टुडे न्यूज नेटवर्क वरून करण्यात आले होते .
या स्पर्धेमध्ये 10,वर्षातील मुले /मुली,15 वर्षा आतील मुले /मुली, 18 वर्षाखालील मुले /मुली, खुला गट पुरुष व महिला, 30 वर्ष पुढील पुरुष व महिला,45 वर्षापुढील पुरुष व महिला,60 वर्षा पुढील पुरुष व महिला असे सात गटातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील प्रथम/ द्वितीय/ तृतीय /क्रमांक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, मेडल व टी-शर्ट देण्यात आले. तसेच सहभागी खेळाडूंनाही सहभाग प्रमाणपत्र व मेडल देखील वाटप करण्यात आले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर सर्व स्पर्धकांना अल्पोपहार म्हणून बिस्किटे, केळी, लेमन गोळ्या व गोविंद चे सुगंधी दूधाचे वाटप करण्यात आले.

या स्पर्धेत वयोगटानुसार यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे –
  ▪️ *10 वर्षा खालील मुले : (02 कि. मी. )* 
1) राजवीर धीरज कचरे – फलटण
2) सार्थक शिवाजी वाघ – 
वाघाची वाडी
3) सुयेश दत्तात्रय धायगुडे – 
CBSE फलटण
3) यश अधिक ढेकळे – 
शौर्य अकॅडमी
▪️ *10 वर्षा खालील मुली : (02 km* )
1) प्रज्ञा उमाजी पाटोळे – 
विटा
2) ईश्वरी सचिन पवार – 
माझेरी
3 स्वरा योगेश भागवत – 
गोखळी
▪️ *15 वर्षा आतील गट –
 मुले – (03 कि.मी)* 
1) मयुरेश संतोष सरगर – 
सांगोला
2) सुयेश सोपान अलदर – सांगोला 
3) साहिल संजय शिंदे – 
मुधोजी कॉलेज
▪️ 15 वर्षा आतील गट –
 मुली – (03 कि.मी)
 1) चैत्राली दत्ता चव्हाण – मार्डी 
2) वनिता लालासो ठोंबरे – वडगाव
3) आकांक्षा संजय देवकर- मार्डी
 ▪️ 18 वर्षा आतील मुले (05 कि. मी.)
1) राम नामदेव मदने – कोळे 
2) शुभम बापू माने – वाई 3) सार्थक रंगनाथ काळेल – माणदेशी
▪️ 18 वर्षा आतील मुली (05 कि.मी.)
1) आर्या अजिनाथ काळेल- माणदेशी 
2) श्रावणी नरेंद्र लिंबे – मांढरदेव 
3) अश्विनी नवनाथ हिरडे – श्रीगोंदा
▪️ 30 वर्षापुढील पुरुष – (07 कि.मी.) 
1) सचिन गणपत निकम – कुडाळ 
2) पंकज दत्तात्रय जाधव- दहिवडी 
3) नितीन हनुमंत गोडसे – EX आर्मी 
▪️ 30 वर्षांपुढील महिला (07 किमी) 
1) प्रियंका ज्ञानेश्वर भोसले फलटण 
2) छाया कल्याणराव मिंड – CBSE इंग्लिश मीडियम  
3) परवीन फारूक मुलानी – SSC इंग्लिश मीडियम
▪️45 वर्षापुढील पुरुष – (05 कि.मी.)
1) दत्तात्रय महादेव कदम – 
बारामती
2) आप्पासाहेब शंकर कुंभार – सातारा
3) संतोष किसनराव भोसले – फलटण
 ▪️45 वर्षापुढील महिला – (05 कि.मी.)
1) अर्चना मोहन यादव – 
फलटण
2) उज्वला नागेश बोडरे –
CBSE इंग्लिश मीडियम
3) अंजुम आलम शेख – 
CBSE इंग्लिश मीडियम
▪️60 वर्षापुढील पुरुष – (03 कि.मी.)
1) अशोक माधवराव आमले – पुणे
2) बजरंग महादेव चव्हाण –
गारगोटी
3) रामचंद्र वामन भोसले – बी. जे. इंग्लिश मीडियम
▪️60 वर्षापुढील महिला- (03 कि.मी.)
 1) जयश्री भागवत रनवरे – 
शेती शाळा
2) आशा गौतम पवार – 
बारामती
3) कुसुम पोपटराव गावडे –
फलटण
▪️ खुला गट – महिला (10 कि. मी.)
1) साक्षी संजय जड्याळ – 
चिपळून
2) वैष्णवी विलासराव सावंत – म्हसवड
3) संतोषी महादेव तरडे – 
म्हसवड
▪️ खुला गट – पुरुष (10 कि.मी.) 
1) महादेव गजानन कोळेकर
2) निशांत विलास सावंत – 
म्हसवड
3) करण हणमंत वाघले – 
मांढरदेवी
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स कोच श्री राजगुरू कोचळे , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्री शिवाजीराव घोरपडे , श्री. गंगवणे बी.एम, सौ .मिनल दीक्षित , क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव घोरपडे , फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे सदस्य डॉ. श्री पार्श्वनाथ राजवैद्य , श्री. सी. डी .पाटील , मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगवणे बी.एम., क्रीडा समितीचे सदस्य श्री .शिरीष वेलणकर, श्री महादेव माने , श्री संजय फडतरे , तसेच श्री भिमदेव बुरुंगले , क्रिकेट ॲकॅडमी चे मार्गदर्शक श्री गाडगीळ , मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य श्री देशमुख डी.एम . पर्यवेक्षक श्री व्हि. जी. शिंदे , हॉर्टिकल्चर चे प्राचार्य श्री.सागर निंबाळकर, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री. कोळेकर हे उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ , सदस्य प्रा.डॉ.स्वप्नील पाटील, श्री . नामदेव मोरे, श्री.जनार्दन पवार , श्री तायाप्पा शेंडगे , श्री राज जाधव ,श्री. उत्तम घोरपडे , श्री नाना तांबे ,श्री अमोल नाळे व प्रविण काकडे ,श्री सुरज ढेंबरे , श्री. अमित काळे, श्री .कुमार पवार , श्री. सुहास कदम ,श्री हर्षल कदम , श्री खुरंगे बी.बी., ॲड. रोहित अहिवळे.,श्री जाधव डी.एन.,कु. धनश्री क्षीरसागर , सौ गाडवे , सौ गेजगे , श्री सुळ ए.बी., श्री बनकर एस.एस., श्री रोहन निकम ,श्री अभिजीत माळवे , श्री सतीश भोसले , श्री. माडकर , चेतन फडतरे , रवींद्र टिळेकर , संतोष जाधव 
 यांनी सहकार्य केले.
 या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई) प्राचार्या सौ. मिनल दिक्षित व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एस.एस.सी.) यांनी देखील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मुधोजी महाविद्यालयाचे एन.सी.सी विभाग प्रमुख श्री. संतोष धुमाळ व त्यांचे सर्व कॅंडेट तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे एन.सी.सी विभाग प्रमुख श्री डी.जे पवार व त्यांचे सर्व कॅडेट व ॲम्बुलन्स सेवा अनमोलरत्न ॲम्बुलन्स चे श्री अमोल रोमन,फलटण केमिस्ट व ड्रगिस्ट चे राज जाधव व त्यांचे सहकारी या वरील सर्वांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुजित जमदाडे व श्री. मुळीक यांनी केले. व क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!