फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. 27) :-
वेदांत श्री प्रकाशन,पुणे प्रकाशित श्री. शिवाजीराव घोरपडे गजेंद्रगडकर लिखित’धोबी पछाड’ या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार, दिनांक ०२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.
‘धोबी पछाड ‘ या कथासंग्रहाचे प्रकाशन
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रसिध्द साहित्यिक, पुणे मा. श्री. बबन पोतदार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठान, फलटणचे सचिव मा. प्राचार्य विश्वासराव देशमुख असणार आहेत
या कार्यक्रमास सन्माननीय उपस्थिती महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई सदस्य मा. श्री. रविंद्र बेडकीहाळ, प्रसिध्द लेखिका, समाज शास्त्रज्ञ पुणे मा.डॉ. अश्विनी शंभूसिंग घोरपडे-गजेंद्रगडकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती निमंत्रक मा.श्री. सत्यजित शिवाजीराव घोरपडे व सौ. धनश्री सत्यजित घोरपडे यांनी केली आहे.