फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि 27 ): –
हराळे वैष्णव समाज संघ बारामती यांच्या वतीने समाज मंदिरात एकता, समानता, मानव प्रेमाची शिकवण देणारे संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या ६४७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला आणि अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी हराळे वैष्णव समाज संघ अध्यक्ष नितीन आगवणे ,उपाध्यक्ष पी. एस .कांबळे, महेश आगवणे, नागेश लोंढे, हनुमंत माने, प्रल्हाद दुर्गे ,संतोष आगवणे, चंद्रकांत सोनवणे, प्रकाश कांबळे, अशोक कांबळे, धर्मराज फसले, दादा अडसूळ व बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी दुपारी बारा वाजता भजन कीर्तन आणि महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते.