मुधोजी हायस्कूलमध्ये १० वी (एस.एस.सी.) बोर्डाची बैठक व्यवस्था

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. 27 ) :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च 2024 ची परीक्षा शुक्रवार दि.1 मार्च 2024 ते दि.26 मार्च या कालावधीत परीक्षा संपन्न होणार आहे.
मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,फलटण केंद्र क्र.1001 येथे बैठक क्रमांक FO23805 ते FO24603 या केंद्रावरती एकुण 798 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रशालेत केलेली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्र (रिसीट), ओळख पत्र व लेखनसाहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. 
उशिरा येणा-या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे. 
विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य श्री. गंगवणे बी. एम., केंद्रप्रमुख /केंद्रसंचालिका सौ. एस. ए. बगाडे., ज्युनिअर चे उपप्राचार्य श्री ज्ञानदेव देशमुख , पर्यवेक्षक श्री शिंदे व्ही. जी., पर्यवेक्षक श्री. जगताप एन. एम., पर्यवेक्षिका सौ. पाटील पी. व्ही. यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!