*शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मल्लखांबपट्टू श्री.विश्वतेज मोहिते व सौ.माया मोहिते हे मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या वार्षिक पारितोषिक व गुणगौरव समारंभाचे प्रमुख आकर्षण !*

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. 27 ) :-

फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटणचा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक व गुणगौरव समारंभ शुक्रवार दि.1मार्च 2024 रोजी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रो.डाँ.पी.एच.कदम यांनी दिली आहे . सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मल्लखांब क्रीडा प्रकारातील शिवछञपती पुरस्कार विजेते मा.श्री.विश्वतेज मोहिते हे प्रमुख 
पाहुणे व शिवछत्रपती पुरस्कार विजेती मा. सौ.माया मोहिते यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये क्रीडाविभाग व सांस्कृतिकविभागातील जिल्हा,राज्य,राष्ट्रीय,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू, कलाकार,एन.सी.सी.,एन.एस.एस.व गुणवत्ताधारक विद्यार्थी यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी खेळाडू , कलाकार , गुणवंत विद्यार्थी ,पालक यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.पी.एच.कदम यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!