फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि.२७ ): –
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचालित झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३०० महिला व मुलींनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. झैनबिया स्कूलमध्ये सामाजिक एकत्रीकरण सेवा कार्यांतर्गत दरवर्षीप्रमाणे ३ किलोमीटर, ६ किलोमीटर, ११किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनची सुरुवात झैनबिया स्कूल कटफळ पासून ते पारवडी रोड,भोला कॉर्नर पर्यंत होते. स्पर्धेचे उद्घाटन सौ.संगीता मेहता, प्राचार्या.इन्सिया नासिकवाला व संस्थेच्या आदि. मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. या प्रसंगी सचिन सागवेकर, नितीन डेरे, आशा बनकर, उषा गावडे, ज्योती तुपे, निशा बंन यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये बारामती, फलटण, इंदापूर तालुक्यातील शाळा, कॉलेज, विविध क्षेत्रातील महिला व मुलींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये वय वर्षे १२ पासून पुढे सर्व वयानुसार स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम क्रमांक:सिद्धी कदम फलटण, द्वितीय क्रमांक: राजनंदिनी लोंढे फलटण, तृतीय क्रमांक: संस्कृती गावडे बारामती, चतुर्थ क्रमांक: अंकिता राजमाने बारामती, पाचवा क्रमांक: अनुप्रिया नाझीरकर बारामती, सहावा क्रमांक: अश्विनी कोकणे बारामती, सातवा क्रमांक: श्रावणी कामटे फलटण यांनी मिळविला.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण पोलीस, के.आर.ए ज्वेलर्स, बालाजी मोटर्स, शिवकृपा व नॅशनल मेडिकल, के टू फिटनेस, महाराष्ट्र इंटेलिजंट सेक्युरिटी सर्विस, ओंकार ॲम्बुलन्स, शतायु हॉस्पिटल, मोता कलेक्शन, प्रिया कलेक्शन, समीर कार, कोठारी गारमेंट्स आदींचे. मोलाचे सहकार्य लाभले.
या सामाजिक उपक्रमातून इयत्ता नववीच्या मुला-मुलींमध्ये व्यवस्थापन, सांघिक कौशल्य, संभाषण कौशल्य, व्यापारीकरण, सामाजिक कार्याचा अनुभव, एकमेकास सहकार्याची भावना तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या काम करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या, अशा प्रकारे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या आणि उत्साही वातावरणात मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. अशी माहिती क्रीडाशिक्षक आप्पासाहेब देवकाते यांनी दिली.