*कौशल्य असेल तर कौतुक होईल.* श्री गणेश खामगळ,संचालक- मिटकाॅन फोरम,पुणे

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि. २७):
 शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापुर्वक योगदान देताना शालेय जीवनात मुलांनी आपल्या अमर्याद बौद्धिक क्षमतेचा सुयोग्य वापर करावा,आपले संस्कार,सवयी,अभ्यासाची आवड,सामाजिक जडणघडण ही शालेय वयात विकसित होत असतात.आधुनिक युगात सामाजिक उत्कृष्टता संपादित करण्यासाठी मुलांनी व्यवसायाभिमुक तांत्रिक कौशल्य आत्मसात करावीत,परिवर्तनशील जीवनात आपल्याकडे कौशल्य असेल तरच कौतुक होईल आणि यश मिळेल असे मत मिटकाॅन फोरमचे संचालक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री गणेश खामगळ यांनी नव महाराष्ट्र विद्यालय,पणदरे येथे पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी व्यक्त केले.
           यावेळी दि.माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सरस्वती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.केशवराव जगताप,उपाध्यक्ष डाॅ गोविंदराव कोकरे,
सचिव कल्याणराव जगताप,संस्थेचे सदस्य महादेवराव जांबले,माजी उपायुक्त राजाभाऊ कोकरे,प्रा.के वाय जगतात ॲड.अजितराव जगताप तसेच कोकरे के बी माजी उपमुख्याध्यापक एल,ए,आतार,प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक हेमंत बारवकर,रामदास कारंडे सर
 प्रशालेचे प्राचार्य शिंदे पी के,उपमुख्याध्यापक ढोबळे बी ए,
 पर्यवेक्षक काळे बी एल सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
           श्री गणेश खामगळ म्हणाले की,शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल आणि नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना मुलांचा कौशल्याधिष्टित विकास आणि व्यक्तिमत्व घडवून आणणे महत्त्वपूर्ण आहे,विद्यार्थी स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमर्याद यश मिळवू शकतो पण शालेय वयातच त्याला योग्य विचार,सवयी,संस्कार व दिशा मिळणे अत्यावश्यक असते,नव महाराष्ट्र विद्यालयातील विविध उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तापुर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यात दिशादर्शक राहील.
         ॲड.केशवराव जगताप म्हणाले की,विद्यालयाचे माजी विद्यार्थी उच्च पातळीवर,समाजाभिमुख आणि दिशादर्शी काम करत असल्याचे पाहून अभिमान वाटतो आहे.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून शालेय पातळीवर आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करित आहोत.
            यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश खामगळ यांना वाॅशिंग्टन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट व शासनाच्या योजना व अंमलबजावणीतील भरीव योगदाना बद्दल विद्यालयाच्या वतीने गौरविण्यात आले.विविध शालेय उपक्रमांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी के शिंदे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक काळे बी एल यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!