प्रल्हाद वरे
फलटण टुडे वृत्तसेवा ।बारामती दि.२५ ।: –
बारामती तालुक्यातील मळद येथील प्रल्हाद गुलाबराव वरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेंद्रिय शेती मधील राज्यातील सर्वोत्कृष्ट असा कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.
गेली ३५ वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र, बारामती व कृषी विभाग, बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली शेतात करत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगाचे, स्वतः करत असलेल्या मार्केटिंगचे व इतर शेतकऱ्यांना स्वतः मार्केटिंग करण्यासाठी दिलेल्या योगदानाचे तसेच आजपर्यंत बारामती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मळद-बारामती व महा आॅरगॅनीक अॅन्ड रेस्युड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन(मोर्फा), महाराष्ट्र च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर संघटन केले आहे व अजुन ही करत आहोत, शेतकऱ्यांचे संघटन करून सेंद्रिय व विषमुक्त शेतमाल पिकवून त्याचे मार्केटिंग महाराष्ट्रातील बहुतांश भागात करत असल्याने व
शेती क्षेत्रात योग्य नियोजन महत्त्वाचे असते, शेतात हवामान बदल अगर निसर्गाच्या कोपामुळे कधीही मोठे नुकसान सोसावे लागू नये म्हणून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आदी कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्याना समर्पित करत असून आयुष्य शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याचे प्रल्हाद वरे यांनी सांगितले