फलटण टुडे (बारामती ): –
बारामती येथील चैतन्य नगर सावळ मधील चैतन्याज् इंटरनॅशनल स्कूल चैतन्यनगर (सावळ) ता.बारामती येथील 12 वी च्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परिक्षेच्या पहिल्या प्रयत्नामध्ये उज्वल यश प्राप्त करुन राज्यामध्ये नावलौकिक मिळवुन दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली आहे,
या वर्षीच्या निकालामध्ये 65 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत, त्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी 99% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत तर 32 विद्यार्थ्यांनी 97% पेक्षा जास्त गुण मिळवून उज्वल यश संपादित केले आहे,
शाळेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांमध्ये शामानंद काटे (99.93%) सिद्धेश माने (99.93%) अभिजित जगताप (99.81%) वेदांत जाधव (99.71%) रविंद्र गायकवाड (99.47%) निखिल शिंदे (99.39%) यशराज जरे (99.37%) प्रशांत डोंबाळे (99.33%) शिवकुमार शेळके (99.06%) व सुयश जगताप (99.02%) इ.
तसेच भौतिकशास्त्र विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा विश्वविक्रम शाळेतील यशराज गायकवाड या विद्यार्थ्यांने रचला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमामध्ये संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक, विद्यार्थी उपस्थित होते,
सदर कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
तसेच जेईई मेन्स परिक्षेच्या पहिल्या प्रयत्नामध्ये यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशन करण्यात आले परिक्षेच्या दुस-या प्रयत्नासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,
या कार्यक्रमामध्ये सर्व 9 वी ते 11 वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मोलाचे योगदान दिले.
—