फलटण टुडे वृत्तसेवा ( मिझोरम ) : –
फलटणची सुकन्या कु.ऋतुजा विनय गाटे हिने मिझोराम राज्यातील शिलाँग येथे पार पडलेल्या तिरंदाजी युनिव्हर्सिटी खेलो इंडिया गेममध्ये कंपाउंड मिक्स प्रकारामध्ये ब्रॉंझ मेडल मिळविले, सद्या कु.ऋतुजा ही विद्या प्रतिष्ठान बारामती येथे बीसीए शिक्षण घेत असून तिने स्कूल नॅशनल मध्ये ब्रॉंझ मेडल, महाराष्ट्र ऑलिम्पिक मध्ये गोल्ड, युनिव्हर्सिटी झोनल मध्ये गोल्ड मेडल मिळविले, तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांत इलग (बुलढाणा) व सुरज ढेंबरे (फलटण) यांचे मार्गदर्शन लाभले, कु.ऋतुजा हिचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), आमदार दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी अभिनंदन केले.