फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती शहरातील १७२९ आचार्य अॅकॅडमीमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
राष्ट्राभिमान जागृत करणे हाच हेतू शिवजयंती साजरी करण्यामागे असावा असा संदेश यावेळी सहसंस्थापक संचालक प्रविण ढवळे सरांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी शिक्षणाच्या चक्रात अडकून आपल्या संस्कृतीपासून दूर जाऊ नयेत यासाठी १७२९ आचार्य अॅकॅडमीकडून प्रसंगानुरूप सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात असतात. शिवजयंतीचा हा कार्यक्रम हा याचाच एक भाग होता. उत्कर्षा काळे, अंजली मुटकुळे, श्रेया नागवडे, संजिवनी रोमण, सिद्धी काबले यांसह आठवी आणी नववीच्या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित नृत्य, पोवाडा, वत्कृत्व यावेळी सादर केले.
विद्यार्थी केवळ शिक्षित न होता सुसंस्कारीत व्हावा या संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे यांच्या प्रेरणेने घेतल्या गेलेल्या या कार्यक्रमावेळी सीएसओ बापु काटकर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर रामराजे घोरपडे, इंदापूर शाखा व्यवस्थापक संजय दळवी, प्रशासकीय विभागाचे मनोज खोपडे उपस्थित होते. हॉस्टेल डिपार्टमेंट प्रमुख साधना दळवी, तुषार मुळीक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनया मोरे यांनी आभारप्रदर्शन सुजाता शेळके यांनी केले.