छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत “जाणता राजा” या महानाट्याचे 22 ते 24 फेब्रुवारी सलग तीन सातारा येथे आयोजन
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 22 ): –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग दि. 22, 23 व 24 फेब्रुवारी, 2024 सलग तीन दिवस सायंकाळी 6:00 ते 9:30 या वेळेत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे. “जाणता राजा” हे महानाट्य पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. महानाट्य पाहण्यासाठी विनाशुल्क प्रवेश पासची व्यवस्था केलेली असून सदर पासेस जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका कार्यालय येथून उपलब्ध करुन घेता येतील. सदर पासेस दाखवल्यानंतरच महानाट्य पाहण्यासाठी प्रवेश दिला जाईल.
महानाट्य पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सैनिक स्कूल, सातारा यांचे मैदानावर वाहनतळाची सोय करणेत आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. कार्यक्रमाची सुरवात आरतीने होणार असून त्यानंतर “जाणता राजा” या महानाट्याचा प्रयोग सुरु केला जाईल. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी “जाणता राजा” या महानाट्याचा आस्वाद घेणेकरीता मोठ्या संख्येने उपस्थित राहणेबाबत मा.श्री. जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी सातारा यांनी आवाहन केले आहे.