बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
विद्यालयाच्या प्राथमिक विभागात विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी प्राथमिक विभागातील अनेक विदयार्थ्यांनी आपल्या मनोगतातून, पोवाड्यातून व गाण्यांच्या माध्यमातून शिवरायांचा जीवन परिचय समोर मांडला. सेवा ज्येष्ठ शिक्षक श्री. केदार पारगांवकर यांनी शिवरायांच्या अंगी असलेल्या गुणांविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे यांनी शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल माहिती सांगितली. प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक श्री. निलेश भोंडवे यांनी केले.
विद्यालयाच्या माध्यमिक विभागात प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यांनी शिवरायांच्या कार्याची ओळख ओघवत्या शैलीत विदयार्थ्यांना करून दिली. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले. प्रसंगी गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख सौ. स्नेहल भिडे, सेवाजेष्ठ शिक्षक श्री.अजित रेवडे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका सौ. तेजस्विनी लोणकर यांनी व आभार शिक्षिका सौ. पद्मजा पळसे यांनी मानले.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, उपाध्यक्ष मा.श्री. सतिश गायकवाड (सर), सचिव मा.श्री. रविंद्र शिराळकर, खजिनदार मा.श्री. सतिश धोकटे व सर्व संचालक यांनी कौतुक व अभिनंदन केले