फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
बारामती औद्योगिक वसाहत येथील फेरेरो इंडिया या कंपनीतील फेरेरो कर्मचारी सहकारी पतसंस्था ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन या मध्ये
चेअरमन विठ्ठल चव्हाण व व्हाईस चेअरमन बाळासाहेब माने ,सचिव
नितीन पवार व संचालक
किशोर मंडलिक, राकेश साबळे, बाळासो रायते,
सचिन भगत, श्रीकांत गायकवाड,
सचिन लंगोटे,सुवर्णा काळे, वर्षा जाधव तज्ञ संचालक किरण तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
सदर कार्यकरणी सण २०२४ ते २०२९ आशा पाच वर्षांसाठी असून कर्मचारी आर्थिक सक्षम व्हावे यासाठी पतसंस्था कार्य करणार असल्याचे इमसोफर कर्मचारी युनियन संघटनेचे अध्यक्ष रमेश नाना बाबर यांनी सांगितले.
७ लाखापर्यंत कर्ज मर्यादा असून ,तातडीचे ४० हजार रुपये कर्मचारी सभासद यांना उपलब्ध करून देऊ व लाभांश १०% देणार असल्याचे चेअरमन विठ्ठल चव्हाण यांनी सांगितले.
आभार किरण तावरे यांनी मानले
—