श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ पंजा लढवणे स्पर्धेला उदंड प्रतिसाद

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ): –
 श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार मुंबई शहर व मुंबई उपनगरात अंतिम टप्प्यात पोहचला असून २१ फेब्रुवारीला या स्पर्धेचा समारोप आहे. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
२१ फेब्रुवारी रोजी क्रीडाभारती मैदान, निरंकारी भवन जवळ, रिक्षा स्टँड, मालवणी रोड, अंबुजवाडी, मालवणी, मालाड (प), मुंबई, महाराष्ट्र ४००९५ येथे मल्लखांब, लंगडी, पंजा लढणे, कबड्डी, कुस्ती, रस्सी खेच, ढोल ताशा व लेझीम या खेळांच्या अंतिम स्पर्धा पार पडणार आहेत. त्यानंतर या स्पर्धांचा बक्षीस समारंभ क्रीडामंत्री मा. ना. संजय बनसोडे, मा. ना. मंगल प्रभात लोढाजी कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री मुंबई उपनगर, प्रसाद महानकर (अखिल भारतीय संघटन मंत्री क्रीडा भारती), राजेश कंकाळ शिक्षणाधिकारी मुंबई महानगरपालिका, क्षीरसागर जिल्हा अधिकारी मुंबई उपनगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.  
पंजा लढवणे या प्रतीक्षा नगर येथे झालेल्या स्पर्धेत जवळजवळ ९०० खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. सहा विभागातील प्रत्येक गटातून प्रथम येणाऱ्या खेळाडूला अंतिम फेरीत स्थान दिले जाणार आहे. त्यातून या स्पर्धेतील अंतिम विजेते निवडण्यात येईल. प्रतीक्षा नगर येथे झालेल्या स्पर्धेत खालील खेळाडूंनी प्राविण्य मिळवले.
१४ वर्षाखालील मुलांच्या ५० किलो वजनी गटात १) नयन तरळ, २) उस्मान खान, ३) सौरभ पांड्ये तर मुलींच्या ४७ किलोवरील वजनी गटात १) प्रांजली गौरव, २) रिझवाना शेख, ३) झोया शेख यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.     
१७ वर्षाखालील मुलांच्या ७० किलो वजनी गटात १) आकाश गुप्ता, २) मो. अनस, ३) झीशान खान यांनी तर मुलींच्या ६० किलो वजनी गटात १) रेखा चव्हाण, २) चंद्रा औजी, ३) नम्रता शिवगण यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.   
तसेच १७ वर्षावरील मुलांच्या ६३ किलो वजनी गटात १) सय्यद महबूब, २) निलेश माजरे, ३) स्वप्नील कांबळे तर मुलींच्या ५४ किलो वजनी गटात १) नीता नवाडकर, २) सुवर्णा कांबळे, ३) नीतू यादव यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!