फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
सुर्यनगरी येथील कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाउंडेशनचे फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल कनेक्ट पोदार जम्बो किड्स या शाळेचे ” वार्षिक स्नेहसंमेलन ” अतिशय नयनरम्य आणि रंगीबेरंगी डान्स परफॉर्मन्स ने नुकतेच जायांट्स ग्रुप ऑफ ग्राउंडच्या प्रांगणामध्ये साजरे झाले.
आकाशातील चिमुकले, सुंदर, चमचमणारे तारे खुद्द मंचावरती उतरले होते. या प्रसंगी विद्या प्रतिष्ठान सचिव अँड. निलिमा गुजर ,संस्थेचे चेअरमन तुकाराम पवार , डॉ. कीर्ती पवार,ओंकार पवार, स्नेहल पवार यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करून साजरा करण्यात आले.
मुलांचे उत्तम नृत्य, अभिनय व सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम पाहून कौतुक असल्याचे मान्यवरांनी सांगितले.या कार्यक्रमाची थीम होती “पंचकोशा”. मुलांना शरीराचे, मनाचे महत्त्व पटवून देणे हा या मागील मुख्य उद्देश! याच निमित्ताने “द बेस्ट टीचर अवॉर्ड” आणि “द मोस्ट फेवरेट टीचर अवॉर्ड” घोषित करण्यात आले. बेस्ट टीचर अवॉर्ड चा खिताब पटकावला आहे, “मिसेस साधना हनुमंत बोराटे”. तसेच “द मोस्ट फेवरेट टीचर” चा खीताब पटकावला आहे, “मिसेस अश्विनी सचिन शिंदे” यांनी.
या कार्यक्रमात तब्बल 11 गाणी सगळ्या कोषा वरती सादर करण्यात आली. शेवटी धमाकेदार आणि सुंदर परफॉर्मन्स झाला तो “बादल पे पाव है, या छुटा गाव हैं, अब तो ये चल पडीss, अब तो ये चल पडी, अपनी ये नाव हैsss,….या गाण्यावर सगळ्यांनी ताल धरला.
शाळेच्या प्रिन्सिपॉल मिसेस सुचित्रा अभय बाकरे, सौ. मोनिका झगडे, सौ. सारिका उगले, सौ.वंदना देवकाते, सौ. योगिता भोसले, सौ. साधना बोराटे, सौ. अश्विनी शिंदे, मिस सायली जाधव.शाळेच्या सेविका सौ. वासंती आणि सौ . स्वाती यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध असल्याचे चेअरमन तुकाराम पवार यांनी सांगितले.