फलटण टुड वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती भिगवण रस्त्यावरील येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रीज या कंपनीच्या बाहेरील बाजूस भिगवन रस्त्यावर कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ( सी एस आर) उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी कंपनीचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट जेसन स्टीफन्स, जॉन वॉर्नर, विनीथ पोडवाल, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अवेलिनो ऑलीवेरा, ऑपरेशन्स डायरेक्टर जितेंद्र जाधव, प्लांट मॅनेजर हनुमंत जगताप यांची उपस्थिती होती. भिगवण व एमआयडीसी कडे जाताना प्रवाशांच्या निवाऱ्याची सोय व्हावी या उद्देशाने हा बस थांबा उभारला आहे श्रायबर डायनामिक्स डेअरीने आजवर अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग दिला असून प्रवाशांच्या सेवेसाठी हा बस थांबा उभारला आहे.
एसटी महामंडळ बारामती एमआयडीसी आगार यांच्या वतीने व प्रवाशाच्या वतीने श्रायबर डायनामिक्स डेअरीचे आभार मानण्यात आले .
————————–