उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार व औद्योगिक प्रदर्शन संपन्न
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
बारामती शहराला उद्योग-व्यवसायाचा समृद्ध वारसा असून शहराच्या औद्योगिक विकासात, पर्यायाने परिसराच्या प्रगतीत उद्योजकांनी मोठा हातभार लावलेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या वतीने उद्योजक मेळावा व गुणवंत उद्योजक पुरस्कार वितरण प्रसंगी अजित पवार बोलत होते याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशहा शेख संचालक महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, हरिभाऊ थोपटे, संभाजी माने, हरीश कुंभारकर, चंद्रकांत नलावडे ,सूर्यकांत रेड्डी ,विष्णू दाभाडे, अभिजीत शिंदे, राजन नायर, हरीश खाडे ,चारुशीला धुमाळ, उज्वला गोसावी व विविध कंपन्यांचे अधिकारी सर्व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून नवनवीन उद्योग राज्यात व बारामती परिसरामध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुद्धा अजित पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी औद्योगिक प्रदर्शनाला भेट देण्यात आली व उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार राधेश्याम सोनार, सौ उज्वला गोसावी, कृष्णा ताटे, दिलीप भापकर व उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कार
प्रताप बरडकर, संदीप जगताप, राजन नायर, अनिल काळे, सर्जेराव खलाटे, महेंद्र साळुंखे, नितीन जगताप, राजाराम सातपुते, राजेंद्र वायसे ,सौ गीता सोनार,सौ शीतल शिंदे व क्वांलीटी एक्सलेंस अवार्ड
अबीरशहा शेख आणि सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार मनोहर गावडे, संभाजी माने, उद्योग मित्र पुरस्कार (शासकीय अधिकारी) उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील,एमआयडीसी कार्यकारी अभियंता निलेश मोडवे, महावितरण मुख्य अभियंता ,सुनील पावडे ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनंत भोईटे यांना अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
एमआयडीसी मधील विविध कार्याचा आढावा व उद्योजकांना निर्माण होत असलेल्या अडचणी व देश पातळीवरील औद्योगिक प्रदर्शन या विषयी माहिती प्रास्ताविक मध्ये अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
या प्रसंगी सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार हरीश कुंभरकर यांनी मानले .
———————–