फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.16) : –
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व अद्याप ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता आपले प्रस्ताव समितीस सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी समिती कार्यालयास सादर करावेत.
तसेच माहे नोव्हेंबर २०२३ पासुन आजअखेर ज्या मागासवर्गीय विद्यार्थी / अर्जदारांनी समितीकडे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अथवा ज्या अर्जदारांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व विद्यार्थी / अर्जदारांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. २६ ते २९ फ़ेब्रुवारी २०२४ दरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या प्रकरणी त्रुटीपुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, उपायुक्त तथा सदस्य, स्वाती इथापे यांनी केले आहे.