शिवजंयतीनिमित्त मद्यविक्री बंद

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.16): –
मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ मधील कलम १४२(१) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या शक्तीचे अनुसार असा आदेश देण्यात येत आहे. की, शिवजयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सातारा शहरातील मिरवणुक मार्गावरील सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री (एफएल-२) परवानाकक्ष (एफएल-३) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टीडी-१ या अनुज्ञप्तीची जागा व विक्री दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाकडून उल्लंघन झालेस त्यांचे विरुध्द मद्य निषेध कायदा १९४९ व त्यांच अंकित असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल तसेच अनुज्ञप्ती बंदच्या कालावधी करीता नुकसान भरपाई दिली जाणार नाही यांची नोंद घ्यावी.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!