गुरुवार दि.15 फेब्रुवारी रोजी मा . पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची गुन्हे बैठक आयोजित केली होती. सदर गुन्हे बैठकीला माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल या उपस्थित होत्या. सदर बैठकीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारामध्ये बक्षीस दिले जातात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चार बक्षिसे मिळालेले आहेत.1फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला सर्वात जास्त मालमत्ता हस्तगत केली म्हणून 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात आले.
2 तसेच 2023 मध्ये सर्वोत्तम अजामीन पात्र वारांची बजावणी बाबतची बक्षीस सुद्धा फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले.
3.पोलीस ठाण्यातील मुद्देमाल निर्मितीचे तिसरे बक्षीस फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले.
4.जानेवारी 2024 मध्ये सर्वात जास्त मालमत्ता हस्तगत चे चौथे बक्षीस फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस हवालदार नितीन चतुरे पोलीस नाईक तात्या कदम पोलीस अम्लदर अमोल जगदाळे हनुमंत दडस संजय देशमुख उर्मिला पेंदाम वैभव सूर्यवंशी संजय अडसूळ चालक पोलीस आमदार योगेश रणपिसे व मदने यांनी केली आहे त्यांना संपूर्ण फलटण ग्रामीण कडील स्टाफचे सहकार्य लाभलेले आहे.