फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
जेईई मेन्स परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये बारामतीच्या १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. अॅकॅडमीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रभुपार्थ अधिक चौधर ( ९९.३२ ), धीरज संपतराव माने ( ९९.०७ ) आणि ओजस महावीर शहा ( ९९.०३ ) यांचा समावेश आहे.
याखेरीज ओम प्रमोद पवार ( ९८.५४ ),स्नेहा गणेश जगदाळे ( ९८.२९ ),समर्थ संजय मुंगसे ( ९८.२३ ), मयुर भरत निकम ( ९८.०४ ), संदेश कुंडलिक वाबळे ( ९७.४० ),प्रथमेश दीपक चांदगुडे ( ९७.३४ ), रणवीर नंदकुमार घाडगे ( ९७.२७ ) मधुरा रत्नदीप भास्करे ( ९७.१३ ), शविरा संग्रामसिंह गायकवाड ( ९७.०६ ),पायल पांडुरंग दगडे ( ९६.३२ ), श्रृती संतोष लोखंडे ( ९६.२५ ), दिव्या संतोष जाधव ( ९६.०३ ), श्रीहरी संजय गायकवाड ( ९६.०० ) ,सोज्वल रमणिक चवरे ( ९५.०० ) यांसह ५० हून जास्त विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले आहेत.
अवघ्या सात वर्षामध्ये १७२९ आचार्य अॅकॅडमीने उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविला असून बारामतीसोबत पुण्यात वाकड येथेही आपली शाखा सुरु केलेली आहे. नुकतीच इंदापूर येथेही नव्याने शाखा सुरु केली असून येथेही विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे, सहसंस्थापक संचालक प्रा. सुमीत सिनगारे, संचालक कमलाकर टेकवडे आणि सहसंस्थापक संचालक प्रा. प्रविण ढवळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
———————