मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील व उपस्थित पदाधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) : –
मराठा समाजाने आर्थिक साक्षर होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा सुद्धा लाभ घ्यावा शासनाने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्या असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ बारामतीच्या शाखा सदिच्छा भेट व मार्गदर्शन कार्यक्रमात नरेंद्र पाटील बोलत होते.
या प्रसंगी बारामती शहर व तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अठरा कमिट्या तयार करून यामध्ये वेगवेगळ्या कमिटीची जबाबदारी पाच लोकांना देऊन आम्ही काम करत असल्याचे व ३०० प्रकरणे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची केल्याचे अध्यक्ष संभाजी माने यांनी सांगितले.