फलटण टुडे (सातारा दि.14 ): –
रस्ता सुरक्षा मोहिम साध्य करण्यासाठी शिस्तीचे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले.
प्रादेशिकर परिवहन कार्यालया राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप झाला. या प्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे, वरिष्ठ सहायक सतिश शिवणकर, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनांचे प्रतिनिधी, वाहन वितरक प्रतिनिधी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप प्रसंगी श्री. चव्हाण म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असून त्या दरम्यान नियमांची माहिती दिली. वाहन चालकांनी आपल्या सोबत इतरांचीही सुरक्षितता साध्य केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
श्री. शिवणकर म्हणाले, वाहन चालकांनी रस्ता सुरक्षेविषयी सर्व नियमांचे उदा. हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, सीटबेल्टचा वापर करणे, तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.