बारामती जेष्ठ नागरिक निवास कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट तांदुळवाडी या संस्थेसाठी 1990 मध्ये श्री. राजेंद्र रघुनाथ बोरावके यांनी तीन एकर जागेचे बक्षीस पत्र संस्थेच्या नावावर करून दिली आहे.
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत श्री राजेंद्र रघुनाथ बोरावके यांच्या कन्या सौ. अनुजा अभय माळी यांनी संस्थेला लागून असणारे 14 गुंठाचा ॲमनिटी स्पेस 13 फेब्रुवारी 2024 रोजी संस्थेस बक्षीस पत्राच्या माध्यमातून मोफत दिला.
सामाजिक कार्य करत असताना समाजापुढे एक आदर्श निर्माण करत सौ. अनुजा अभय माळी यांनी ही जागा वृद्धाश्रमासाठी मोफत दिलेली आहे.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने सौ. अनुजा अभय माळी व संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र रघुनाथ बोरावके, श्री. अभिजीत राजेंद्र बोरावके, श्री. कपिल राजेंद्र बोरावके यांचा सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार हा संस्थेचे सेक्रेटरी श्री. किशोर शंकर मेहता, खजिनदार श्री. फखरुद्दीन अब्बास भाई कायमखानी, विश्वस्त डॉ. श्री अजित त्रिंबक अंबर्डेकर, विश्वस्त डॉ. श्री अजिंक्य सर्वदमन राजेनिंबाळकर यांनी केला.