फलटण टुडे (बारामती ): –
जग डिजिटल होत असताना मराठा समाज्यांनी लग्नसमारंभ यावर उधळपट्टी करू नये ,जमीन रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे,शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, आर्थिक व सामाजिक साक्षरता महत्वाची असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.
रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते या वेळी जिल्हाध्यक्ष ऍड. पांडुरंग जगताप, बारामती तालुकाध्यक्ष संभाजी माने, शहर अध्यक्ष हेमंत नवसारे,युवक अध्यक्ष गणेश काळे, तालुका महिला अध्यक्ष ऍड. सुप्रिया बर्गे, महिला शहर अध्यक्ष अर्चना सातव व इतर मान्यवर उपस्तीत होते.
या वेळी मराठा समाज्या साठी शासनाच्या विविध योजना ,नियम अटी, जगण्याची आदर्श आचारसंहिता विविध विषयांवर पुस्तकाचे प्रकाशन १९ फेब्रुवारी रोजी होणार असून त्याचे वितरण करण्याचे आव्हान राजेंद्र कोंढरे यांनी केले.
या वेळी पदाधिकारी नियुक्ती पत्रे देण्यात आले.
आभार ऍड. वीणाताई फडतरे यांनी मानले.