मुधोजी बालक मंदिर चे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण संमारंभ 12 फेब्रुवारी रोजी

फलटण टुडे वृतसेवा :- 
फलटण एज्युकेशन सोसायटी चे मुधोजी बालक मंदिर ,फलटण या प्रशालेचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण संमारंभ सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ठिक 4.30 वाजता फलटण एज्युकेशन सोसायटी चे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व डाॅ.सतिश फरांदे , अधिव्याख्याते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.  
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रशालेचे वार्षिक पारितोषिक वितरण संमारंभ व विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम सायंकाळी ठिक 4 .30 वाजता फलटण एज्युकेशन सोसायटी चे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे संपन्न होणार आहे. 
या समारंभास प्रशालेच्या चेअरमन मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर व फलटण एजुकेशन सोसायीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या समारंभासाठी पालक व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे . असे आवाहन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रजपूत यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!