फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी ) :-
सायकल चालवल्यामुळे प्रदूषण होत नाही, शरीराचा चांगला व्यायाम होतो.शरीर आणि मन निरोगी उत्साही व आनंदी राहते असा संदेश देत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बारामती सायकलच्या वतीने बारामती ते गुजरात ६७५ किलोमीटरचा सायकल राईड प्रवास आठ सहकारी सायकलपटू समवेत
बारामती सायकल क्लबच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसागर गुरुकुल सावळच्या कार्तिक निंबाळकर बारामती ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आंतर पार केले.
.यावेळी या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, संस्थेचे सचिव श्री.मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे,दिपक सांगळे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक बिबे, सी.ई.ओ.संपत जायपत्रे,विभागप्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय शिंदे,सुधीर सोनवणे, निलीमा देवकाते, राधा नाळे,नीलम जगताप, रिनाज शेख व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक यांनी अभिनंदन केले.