फलटण टुडे (बारामती ): –
कामगारांच्या हितासाठी आयुष्यभर काम करत असताना आठवडा भर काम केल्यावर श्रम परिहार व्हावे , त्यांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहावे या साठी शासना बरोबर लढा देत रविवार हा दिवस सुट्टी म्हणून करवून घेणारे व निस्वार्थी पणे कामगारांसाठी झटणारे कामगार नेते नारायण
मेघाजी लोखंडे यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्रायबर डायनॅमिक्स डेअरिंज एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी केले.
भारतीय कामगार चळवळीचे जनक तसेच रविवार या साप्ताहिक सुट्टीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि.०९ फेब्रुवारी रोजी श्रायबर डायनामिक्स डेअरीज कंपनी मध्ये
आदरांजली कार्यक्रमात नानासाहेब थोरात कामगारांना मार्गदर्शन करत होते या प्रसंगी
कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब थोरात, कार्याध्यक्ष राजेंद्र काकडे, खजिनदार गणेश जगताप,सह. चिटणीस तुलसीदास मोरे, सह चिटणीस ओंकार दुबे, जेष्ठ कामगार अनंत पाटील, विजय चव्हाण, अमर पवार, विजय गोसावी, दादा भोईटे, नवनाथ जगताप तसेच कामगार उपस्थित होते.
विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
———————–