फलटण टुडे :-
फलटण नजीक कोळकी वनदेवशेरी येथील चि.प्रसाद नाळे यांनी UPSC मार्फत भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर आपले नाव कोरले.
फलटण नगरीच्या सुपुञाच्या ऊज्वल यशा बद्दल संगिनि फोरम,फलटणने शाल – श्रीफळ-सन्मान चिन्ह देऊन चि.प्रसाद नाळे याचां यथोच्चीत सत्कार केला.
यावेळी चि.प्रसाद नाळे याच्यां प्राथमीक शिक्षिका व संगीनि सदस्या ममता शहा याचांहि संगीनि फोरम कडुन सत्कार करण्यात आला. यावेळी संगिनि अध्यक्षां अपर्णा जैन,सचिव प्रज्ञा दोशी,खजिनदार मनिषा घडिया,माजी सचिव दिप्ती राजवैद्य,पोर्णिमा शहा,संगिनि सदस्या जयश्री ऊपाध्ये,दिपिका व्होरा तसेच डाँ.नाळे ऊपस्थीत होत्या. सत्कारा बद्दल प्रसाद नाळे यांनी संगीनि फोरमला धन्यवाद व्याक्त करुन आपल्या शैक्षणीक प्रवासा बद्दल मनोगत व्याक्त करुन आपले आज्जी-आजोबा,आई -वडिल,चुलते -चुलती व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रेरणे मुळे यश संपादन केल्याचे प्रतिपादन केले. संगिनि अध्यक्षां अपर्णा जैन यांनी प्रसाद नाळे यांचे यश भावी तरुण पीढीला निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगुन प्रसाद नाळे यानां भावी कारकीर्दि साठी शुभेच्छा दिल्या. दिप्ती राजवैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचालन केले.