बारामती येथील १७२९ आचार्य अॅकॅडमीमार्फत फलटण येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या रविवारी फलटणच्या आर्यमान हॉटेलच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
दहावीची परीक्षा आता लवकरच सुरु होते आहे. तत्पूर्वीच दहावीनंतर पुढील वाटचाल आणि संधी, अकरावी आणी बारावी या दोन वर्षांचे भविष्यकालीन वाटचालीतील अनन्यसाधारण महत्व, विविध प्रवेश परीक्षांची माहिती आणि त्यांची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर माहिती या गुरुमंत्र यशाचा या कार्यक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
आचार्य अॅकॅडमीचे संचालक सुमित सिनगारे आणि प्रविण ढवळे हे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सुमीत सिनगारेंनी पुण्यातील नामवंत सीओईपी इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवी घेतलेली असून आयआयएम अहमदाबाद येथून उच्चशिक्षण प्रात्प केले आहे. श्री. सिनगारे सर यांनी शेकडो विद्यार्थ्यांना लष्करी अधिकारी होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या एनडीएच्या परीक्षेसाठी यशस्वी मार्गदर्शन केलेले आहे. या कार्यक्रमात ते एनडीएसोबतच इंजिनिअरींग क्षेत्राकडे जाण्यासाठीची जेईई व एमएचटी-सीईटी, वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठीची नीट तसेच आयआयटीमध्ये जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरीक्षांबाबतही मार्गदर्शन करणार आहेत. प्रविण ढवळे यांनी हैद्राबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल युनिव्हरसिटीतून एम. टेकची पदवी केलेली आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख असून दहावीच्या परीक्षेबाबतच्या महत्वाच्या टीप्स ते यावेळी विद्यार्थ्यांना देणार आहेतच सोबतच दहावीनंतरच्या करियरच्या संधींबाबतही मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रात सर्वोत्तम निकाल देणारी अॅकॅडमी म्हणून १७२९ आचार्य अॅकॅडमी अल्पावधीतच नावारुपाला आलेली आहे. दहावीची परीक्षा आणि निकाल यांची वाट न पाहता विद्यार्थी आणि पालकांनी दहावीनंतरच्या करियरबाबत विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ७२४९५११७२९ या नंबरवरून नोंदणी करता येईल. तरी फलटण परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आलेले आहे.