राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.)फलटण आगारातील ज्येष्ट चालक सयाजी विर आपली प्रदीर्घ प्रवाशी सेवा पुर्ण करुन सेवा निवुत्त झाले.
सेवा निवुत्ती निमीत्त त्यांनी कर्मचारी बंधु करिता १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट देऊन वेगळा आदर्श निर्माण केला.
फलटण आगार वार्षिक ऊत्सव समिती मार्फत सयाजी विर याचां पुर्ण पोषाख,स्मुती चिन्ह देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक,वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे,वाहतुक निरिक्षक रविंद्र सुर्यवंशि,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे, माऊलि कदम,विवेक शिंदे,संजय टाकळे,केदार गरवारे ,विर यांचे कुटुंबिय तसेच बहुसंख्य कर्मचारी ऊपस्थित होते.
पाण्याची टाकी दिल्या बद्दल सयाजी विर यानां एस.टी.प्रशासना तर्फे व कर्मचारी यांचे कडुन धन्यवाद देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञ संचालन श्रीपाल जैन यांनी केले.