व सिद्धी आंबेकर, श्रावणी बोरकर विजयी
फलटण टुडे (मुंबई ) :-
, मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात आज मल्लखांब व विटी दांडू या खेळांनी दिवसभर सोडला. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
विटी दांडू या आपल्या पारंपारिक खेळाला सुद्धा चांगला प्रतिसाद मुंबईकरांनी दिला. १७ वर्षाखाली व खुल्या गटात या स्पर्धा जांभोरी मैदान वरळी येथे खेळविण्यात आल्या. तर मुंबई शहरात मल्लखांबाच्या अतिशय उत्कृष्ट अशा स्पर्धा चिंचपोकळी येथे संपन्न झाल्या.
विटीदांडू मुंबई शहर
विटी दांडू या खेळाच्या स्पर्धा जांभोरी मैदान वरळी येथे खेळविण्यात आल्या त्यात १७ वर्षाखाली मुलांच्या गटात सिद्धिविनायक क्लबने बालविकास मंदिराचा २५-१५ असा १० गुणांनी पराभव केला व अंतिम फेरीत दणदणीत विजय मिळवला. तर गणपतराव कदम एम. पी. एस. शाळेला तृतीय व ब. भा. मराठा मंदिर शाळेला चौथा क्रमांक मिळाला. मुलींच्या अमुलख शाळेने सिद्धीविनायक क्लबचा पराभव करत विजेतेपद मिळवले. खुल्या गटात मुंबई शहर विटी दांडू असो. ने पुरुष व महिला गटात विजेतेपद मिळवले.
मल्लखांब मुंबई शहर
चिंचपोकळी येथे झालेल्या मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विभाग एक मध्ये १) समर्थ पांचाळ, २) विहान गांगर, ३) ऋषभ चव्हाण विभाग दोन मध्ये १) श्रेयांश शिंदे, २) राजीव वर्मा, ३) स्वयं कांबळे, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात विभाग एक मध्ये १) श्लोक परब, २) मंथन डोंबाळे व विभाग दोन मध्ये १) मनोज वर्मा, 2) प्रथमेश चरकरी, १९ वर्षांखालील मुलांच्या गटात विभाग दोन मध्ये १) करण विश्वकर्मा व २) अथर्व तांडेल यांनी तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात विभाग एक मध्ये १) हृदय दळवी, २) कृपाश्री बिडू, ३) उपाधी पाटकर विभाग दोन मध्ये १) शमा वाघ, २) सुहानी अली, ३) राधना वर्मा, १७ वर्षांखालील मुली विभाग एक मध्ये १) सिद्धी आंबेकर, २) श्रावणी वाघधरे, विभाग दोन मध्ये १) श्रावणी बोरकर, २) उर्मिला धुरी, ३) अनुश्री गडकर व १९ वर्षांखालील मुली विभाग एक मध्ये 1) अन्वी बारिया, २) श्रावणी मोरे, ३) प्रिशा शिर्के यांनी वेगवेगळ्या विभागात एक ते तीन क्रमांक पटकावले.