सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर-वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन,

     

फलटण टुडे :-
बुधवार, दि. ७ फेब्रुवारी २०२४
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांसाठी “राष्ट्रीय एकात्मता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.०० वा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जाती-धर्म, प्रांत, भाषा, आचार-विचार, आहार इत्यादीमध्ये विविधता असूनही देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे असे मत डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. एकात्मता ही राष्ट्राची शक्ति आहे म्हणून तिच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे. 
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉ. जवाहर चौधरी यांनी “राष्ट्रीय एकात्मता आणि युवक” याविषयावर उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांमध्ये तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता असणे गरजेचे आहे हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्याना पटवून दिले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये “राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. जया कदम यांनी असे मत व्यक्त केले की, मानवी शरीरामध्ये जसे ऑक्सीजन हा प्राणवायू अत्यंत महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे एकात्मता हे भारताचे प्राणतत्व आहे. एकात्मतेशिवाय देशाची प्रगती, त्याचा विकास होऊ शकत नाही. देशाची एकात्मिक व सांघिक प्रगती ही एकात्मतेवर अवलंबून असते.  
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव यांनी उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. प्रविण ताटे-देशमुख, प्रा. आर. एस जगताप, प्रा. मेघा जगताप, आर. डी. गायकवाड, डॉ. संजू जाधव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. निलेश आढाव, डॉ. नारायण राजुरवार, प्रा.आदिनाथ लोंढे, डॉ. राहुल खरात, प्रा. रविकिरण मोरे, प्रा. नामदेव जाधव, प्रा. अनिकेत भोसले, प्रा.चेतना तावरे, अमोल काकडे, विनायक आगम, निखिल जगताप, सुजीत वाडेकर, अतुल काकडे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यशाळा यशस्वी केली. तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर कु. तृप्ती बनसोडे, कु. आरती मदने व संकेत साळवे यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. कुलदीप वाघमारे यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!