जयदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्ता योद्धा स्पोर्टस् क्लब चे विविध कार्यक्रमाचे आयोजन

यशस्वी विद्यार्थ्यां समवेत साहेबराव ओहोळ

फलटण टुडे (बारामती  प्रतिनिधी ) :-
 युवा नेते जयदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त योद्धा स्पोर्टस् क्लब व ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनगरी मध्ये राष्ट्रीय पिंच्याक सिलाट निवड चाचणी, एकदिवशीय बेल्ट परीक्षा आणि एकदिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या मध्ये सूर्यनगरी व बारामती परिसरातील १०० मुलांनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. या निवड चाचणीतील १०० पैकी ३० मुलांची निवड नांदेड या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे उदघाट्न पुणे जिल्हा सरसिटणीस राष्ट्रवादी पार्टी चे प्रा अजिनाथ चौधर यांच्या हस्ते करण्यात आले.
 ग्रँडमास्टर आनंदकर राष्ट्रवादी काँग्रेस श्रीगोंदा तालुका अध्यक्ष, श्री.जयश आनंदकर व योद्धा स्पोर्टस् अकॅडमीचे संस्थापक साहेबराव ओहोळ यांच्या उपस्थितीत पार पडला. 
योद्धा स्पोर्टस् क्लब बारामती व सूर्यनगरी परिसरात खेळाचा विस्तार अतिशय प्रामाणिक आणि उत्साहाने करत आहे. तसेच बारामतीच्या मुलांना शासकीय मान्यतेचे खेळ देत आहे. व येणाऱ्या काळात आपल्या बारामतीचे खेळाडू नक्कीच ऑलम्पिक लेवलच्या स्पर्धा खेळतील अशी अपेक्षा प्रा. अजिनाथ चौधर यांनी केली.
    बारामती ते काटेवाडी सायकल रॅली , रक्तदान शिबीर व राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धा माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती योद्धा स्पोर्टस् अकॅडमीचे संस्थापक साहेबराव ओहोळ यांनी दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!