ग्रामीण भागातील पहिली अद्यावत सर्व सुविधांयुक्त अभ्यासिका
फलटण टुडे (बारामती ): –
कोणताही अभ्यास करताना शांतता मय वातावरण पाहिजे तरच उत्तम,उत्कृष्ट अभ्यास होऊ शकतो पर्यायाने गुण वाढतात व यश येते.
हाच विचार पकडून बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित राजमाता जिजाऊ करिअर सेंटर ची सुरुवात झाली व या सेंटर च्या अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
या पैकी सेक्शन ऑफिसर निकेतन विजय चांदगुडे, नायब तहसीलदार आशिष बापूराव खोमणे, वन अधिकारी शिवानी अजिनाथ पाणगे,पोलीस उपनिरीक्षक रुपाली राजेंद्र गरगडे आणि २०२४ मधील चार्टड अकाउंटंट सुजित मिलिंद देव, तलाठी योगेश बाबासाहेब जगताप, सर्वेअर (भूमी अभिलेख) तुषार अशोक भगत या विद्यार्थ्यांनी अभ्यासिके मध्ये अभ्यास करून विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध खात्यात अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
राजमाता जिजाऊ करिअर सेंटर मध्ये अभ्यास करण्यासाठी संगणक , इंटरनेट सुविधा, कॉन्फरन्स हॉल, सर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तके,इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन, जेवण करण्यासाठी डायनींग हॉल, पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहेत स्पर्धा परीक्षा बरोबर शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा अभ्यास करण्यासाठी येत असतात.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे ,विश्वस्त , देवेंद्र शिर्के, मनोज पोतेकर ,प्रदीप शिंदे, दीपक बागल, पोपटराव वाबळे,ऍड विजय तावरे,दिलीप ढवाण ,प्रमोद शिंदे,सौ जयश्री सातव, सौ. छाया कदम, सौ. ललिता जगताप यांनी विद्यार्थ्यां साठी उत्तम सेवा देण्याचा व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सहकार्य करण्याचे ठरवले आहे त्यानुसार येथील कामकाज चालते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक,इंटरनेट सुविधा नसतात किंवा अभ्यास करण्यासाठी पुस्तके किंवा स्वतंत्र व्यवस्था नसते असे विद्यार्थी सकाळी डबा घेऊन येतात व दिवसभर अभ्यास करून परत आपल्या गावी जातात तर शहरी भागात सुद्धा काही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शांतता व पोषक वातावरण नसते त्यांनाही सेंटर चा फायदा होत असल्याचे अध्यक्ष नामदेवराव तुपे यांनी सांगितले.
दिवसेंदिवस सेंटर चा नावलौकिक वाढत असताना विद्यार्थी संख्या वाढत आहे व येणाऱ्या काळात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनाही यश येईल व जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करून अधिकारी झाले त्यांचे यश अभिनंदनिय व इतर विद्यार्थ्यांना आदर्शवत असल्याचे विश्वस्त देवेंद्र शिर्के यांनी सांगितले.