फलटण टुडे (बारामती ):-
बारामती शहरातील अंबिका नगर येथील सुनील काळे यांची
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
प्रदेश अध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी सेवादल प्रदेश अध्यक्ष राजेंद्र लावंघरे (देशमुख), महिला अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण, शिवाजीराव गर्जे आमदार अमोल मिटकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करू व शासनाच्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडीनंतर सुनील काळे यांनी सांगितले.