आरोग्याची गुरुकिल्ली जलतरण तलाव : जवाहर वाघोलीकर

बारामतीच्या आरोग्याच्या वैभवात भर घालणारा वीर सावरकर जलतरण तलाव चे नूतनीकरण 

नूतनीकरण समारंभ प्रसंगी वीर सावकर स्वीमर्स क्लबचे पदाधिकारी

फलटण टुडे (बारामती ) :
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे परंतु व्यायामाचा राजा व आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे पोहणे आहे व त्यासाठी साह्य करणारा जलतरण तलाव म्हणजे असंख्य आजार बरा करणारा डॉक्टर असल्याचे अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे सल्लागार जवाहर वाघोलीकर यांनी प्रतिपादन केले.
गुरुवार दि.१ फेब्रुवारी रोजी वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे नूतनीकरण निमित्त आयोजित कार्यक्रमात जवाहर वाघोलीकर बोलत होते या प्रसंगी 
वीर सावरकर स्वीमर्स क्लब बारामतीचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे, सल्लागार जवाहर वाघोलीकर, महेंद्र ओसवाल, मा. न्यायाधीश राजेंद्र जाधव सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक अनिल सातव,अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया, दीपक बनकर,शर्मिष्ठा जाधव व मा. सचिव प्रवीण आहुजा, व विजय जोशी व्यवस्थापक सुनिल खाडे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्तीत होते.
सभासदाच्या आरोग्यासाठी व ऊत्तम सेवा सुविधा देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे यांनी सांगितले तर अत्याधुनिक सेवा सुविधा देत असताना लवकरच महिलां साठी नवीन जलतरण तलाव चे बांधकाम सुरू होणार असल्याचे सचिव विश्वास शेळके यांनी सांगितले.
या प्रसंगी मा सचिव प्रवीण आहुजा यांनी मनोगत व्यक्त केले.
रंगरंगोटी, अत्याधुनिक जिम, स्वच्छ पाणी करणारी यंत्रणा, स्वतंत्र लॉकर्स,आदी सुविधा नूतनीकरण मध्ये असल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर आभार अमोल गावडे यांनी मानले

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!