फलटण टुडे (बारामती : प्रतिनिधी) :-
बारामती शहर पोलीस बॉईज असोसिएशन व बारामती शहर युवती आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले
तसेच यावेळी महिला आघाडी कामी हिना कौसर आत्तार यांची शहराध्यक्षपदी, श्वेता डोंगरे सचिवपदी, दिव्या आढाव सहसचिवपदी, अपर्णा आढाव कार्याध्यक्षपदी, शिवानी सुर्वे सदस्या तसेच बारामती शहर पोलीस बॉईज च्या सहकार्याध्यक्षपदी कल्याण मोहिते या सर्वांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे, बारामती शहर अध्यक्ष शितल शहा, कोषाध्यक्ष विनीत किवै, कल्याण मोहिते, अँड. मेघराज नालंदे, युवती आघाडीच्या सचिव सृष्टी झगडे, माधव झगडे, श्वेता डोंगरे, अपूर्वा अढाव, दिव्या अढाव,शिवानी सुर्वे, विशेष शिक्षक अश्विनी भोसले, संजय शिंदे यादी मान्यवर उपस्थित होते.