मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ध्वजास मानवंदना देताना अशोक जीवराज दोशी फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे सदस्य , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व इतर मान्यवर


फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि.30) :- 
   फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आपल्या भारत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात आणि रंगारंग कार्यक्रमात साजरा करण्यात आला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी मा.श्री. धनाजी नामदेव जाधव उपस्थित होते ध्वजारोहन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री अशोक जीवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष रमणलाल दोशी , ट्रेझरर हेमंत रानडे , क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, सदस्य डॉ राजवैद्य , सदस्य चंद्रकांत पाटील , प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा तसेच प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , ॲड. रामकृष्ण धुमाळ ,दीपक दोशी ‘शिरीषशहा,प्रभाकरभोसले,विठ्ठलराव माने ,सुरेश शिंदे ,मारुती पवार ,उपप्राचार्या सौ सुनिता माळवदे ,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख , पर्यवेक्षक व्ही जी शिंदे , नितीन जगताप , पर्यावेक्षिका सौ पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते . 


 यावेळी राष्ट्रगीत , महाराष्ट्र गीत सौ. लोणकर यांनी सादर केले, श्री पवार डि जे यांच्या मार्गदर्शनात एन सी सी कॅडेट कडून परेड च्या माध्यमातून सलामी देण्यात आली . यावेळी शिक्षकांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवर मंडळींकडून करण्यात आले .

तसेच  फलटण एज्युकेशन सोसायटी संस्थांतर्गत देण्यात येणारा माजी गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक /शिक्षिका ,सेवक पुरस्कार यावेळी देण्यात आले माजी विद्यार्थी मा.श्री. धनाजी नामदेव जाधव यांना माजी गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .


यावेळी गुणवंत शिक्षक पुरस्काराने श्री अमोल नाळे यांना तर गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सौ विजयमला माने व गुणवंत सेवक पुरस्कार श्री चंदर निंबाळकर यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला .

तसेच यावेळी कला , क्रीडा या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत , विभागीय स्पर्धेत तथा बाह्यपरीक्षेत दैदीप्यमान यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या माध्यमातून इयत्ता ५ वी ते १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व क्रीडा स्पर्धत यश संपादन केलेल्या हॉकी , किक बॉक्सिंग , योगा इत्यादी खेळातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला  

तसेच यावेळी इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम या नृत्य प्रकारावर सर्वांना ठेका धरायला लावाला यास श्री बी. बी. खुरंगे व श्री डी. एन जाधव यांनी मार्गदर्शन केले . इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्यात्मक कवायत प्रकार व ॲरोबिक्स सादर केले यास श्री अनिल यादव व श्री सचिन धुमाळ यांनी मार्गदर्शन केले यावेळी स्वरा भांडवलकर हिने दानपट्टा प्रात्यक्षिक सादर केले तसेच यावेळी श्रेया खिलारे हिने योगा प्रत्यक्ष सादर केले तर इयत्त ५ वी च्या देशभक्तीपर नृत्य सादर केली यास कु तृप्ती शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले व उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली त्यानंतर एन सी सी मार्फत सर्व विद्यार्थ्यांना केळी व जिलेबीचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . टी व्ही शिंदे ,संजय गोफणे , संदीप पवार , सुजित जमदाडे यांनी केले.
 
अशा प्रकारे भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!वंदे मातरम!भारत माता की जय! या जयघोषामध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!